सुनील ग्रोव्हरचा कॉमेडी शो होणार बंद

कॉमेडियन सुनील ग्रोव्हरचा “कानपूरवाले खुराणाज्‌’ हा कॉमेडी शो खपूच चर्चेत आहे. पण आता हा शो बघणा-या चाहत्यांची घोर निराश होणार आहे. कारण हा शो लवकरच बंद होणार आहे. सुनील ग्रोव्हरचा हा शो नुकताच सुरु झाला होता. तो प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतला होता. पण हा शो आता बंद होणार आहे.

“कानपूरवाले खुराणाज’ हा शो सलमान खानच्या आगामी “भारत’ चित्रपटामुळे बंद होणार आहे. याचा खुलासा खुद्द सुनील ग्रोव्हरनेच एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुनीलने यावेळी शो माझ्यामुळेच बंद होत असल्याचे सांगितले. केवळ 8 आठवड्यांसाठीच मी हा शो साईन केला होता. कारण आधीच “भारत’ या चित्रपटासाठी मी माझ्या डेट्‌स दिल्या होत्या. प्रेस कॉन्फरन्स व अनेक मुलाखतीतही मी हे स्पष्ट केले होते. जितका वेळ माझ्या हाती होता, मी तितकाच देऊ शकलो. टीव्हीला मी खूप मिस करत होतो. माझ्याकडे “भारत’च्या शूटींगदरम्यान महिनाभराचा वेळ होता. त्यामुळे महिनाभराचा शो मी सत्कारणी लावला, असे सुनीलने सांगितले. सुनील “भारत’च्या शूटींगमध्ये बिझी झाला असून पुढील दीड महिना हे शूटींग चालणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)