सुनंदा भागवत बनल्या एक दिवसाच्या ठाणे अंमलदार

संगमनेर: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने संगमनेर तालुक्‍यातील नांदुर खंदरमाळ येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व सरपंच सुनंदा भागवत या महिलेकडे शनिवारी घारगाव पोलीस ठाण्याचा कारभार प्रायोगिक स्वरूपात देण्यात आला होता. पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्ताने ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, पत्रकार यांना एक दिवस पोलीस ठाण्यात पोलिसांचे दैनंदिन कामकाज प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी मिळते आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील घारगाव पोलीस ठाण्याचा कार्यभार त्यांना देण्यात आला होता.

पोलीस दल स्थापना दिनानिमित्ताने घारगाव पोलीस ठाण्याच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पोलीस ठाण्यातील महत्वाचे पद असलेल्या प्रभारी पदाचा एक दिवसाचा पदभार स्विकारताना, त्यांना मदतनीस म्हणून पोलीस निरीक्षक अंबादास भुसारी यांनी दैनंदिन कामकाजाबाबत माहिती दिली. पोलीस कामकाजाबाबत माहिती घेताना, एक महाविद्यालयीन तरुणी आपली समस्या घेऊन आली. सुनंदा भागवत यांनी तिची समस्या जाणून घेवून, समोरील व्यक्तीस फोन करुन पोलीस ठाण्यात बोलावले. महिलांना योग्य व सन्मानाची वागणूक देण्याची तंबी देवून त्यांच्यातील वाद सामंजस्याने मिटवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पदामुळे मिळालेल्या जबाबदारीच्या कामाबद्दल आणि सन्मानजनक वागणुकीबद्दल पदभार स्वीकारलेल्या महिला सरपंचांनी समाधान व्यक्त केले. तसेच त्यांच्याकडे तक्रार देण्यासाठी आलेल्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केले. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला. तर आमचा दिवस आमच्यादृष्टीने प्रेरणादायी व नवी दिशा देणारे ठरल्याचे पोलीस ठाण्याचा पदभार तात्पुरता प्रायोगिक स्वरूपात स्वीकारलेल्या सुनंदा भागवत यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)