मुंबई : आगामी निवडणुका डोळ्यासंमोर ठेवून भाजप आणि शिवसेनेतील युतीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट होण्याची शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. अद्याप भेट निश्चित झाली नाही. मात्र उद्धव ठाकरेंकडून भेटीसाठी वेळ दिला गेल्यास, संध्याकाळी पाच वाजता ‘मातोश्री’वर या दोघांचीही भेट होईल.

नाणार प्रकल्पाला होत असलेला कडवा विरोध, वर्षभरावर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केलेली सत्ताधाऱ्यांची कोंडी, युतीची चर्चा या पार्श्वभूमीवर ही मुनगंटीवारांनी मागितलेली वेळ अत्यंत महत्वाची मानली जाते आहे. याआधीच शिवसेनेनं भविष्यात भाजपशी कुठलीही युती करणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता या भेटीत नेमकं काय गुफ्तगू होते याकडे दिल्लीचेही लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)