सुधीर भार्गव नवे मुख्य माहिती आयुक्त

नवी दिल्ली – केंद्र सरकारने केंद्रीय माहिती आयोगाच्या रखडलेल्या नियुक्‍त्या आज अखेर जाहीर केल्या. त्यात सुधीर भार्गव यांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या खेरीज अन्यही चार माहिती आयुक्त तेथे नेमण्यात आले आहेत.

भार्गव हे माहिती आयोगावर आधीही आयुक्त म्हणून काम पहात होते पण आता त्यांची नियुक्ती मुख्य आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. यशवर्धनकुमार सिन्हा, वनजा सरना, नीरजकुमार गुप्ता आणि सुरेश चंद्रा अशी नियुक्ती करण्यात आलेल्या अन्य चार आयुक्तांची नावे आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या नियुक्‍त्यांना मंजुरी दिली आहे. हे सर्व अधिकारी उच्चपदस्थ आधिकारी असून त्यांना भारतीय प्रशासन सेवेतील कार्याचा मोठा अनुभव आहे. या आयोगावरील नियुक्‍त्या बरेच दिवस रखडल्या होत्या. त्याच्या संबंधात माहिती आधिकार कार्यकर्त्यांनी आवाजही उठवला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)