सुधारीत बांबु मिशनला केंद्र सरकारची मान्यता

दोन वर्षात 1290 कोटींचा खर्च
नवी दिल्ली – केंद्र सरकारने सुधारीत बांबु मिशनला मान्यता दिली आहे. त्यासाठी येत्या दोन वर्षांत 1290 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने हा प्रस्ताव संमत केला आहे. या योजनेचा सुमारे, एक लाख शेतकऱ्यांना लाभ होईल असा सरकारचा दावा आहे. दोन वर्षात यासाठी जे 1290 कोटी रूपये खर्च होणार आहे त्यातील 950 कोटींचा वाटा केंद्र सरकार उचलणार आहे.

या उपक्रमाअंतर्गत बांबुच्या शेतीला प्राधान्य दिले जाणार असून एक लाक हेक्‍टर क्षेत्रावर बांबुची लागवड केली जाणार आहे. ईशान्येकडील राज्यांना याचा लाभ होईल. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगह अदि राज्यांमध्येही बांबु लागवडीसाठी प्रयत्न केले, जाणार आहेत. बांबु लागवडीतून शेतकऱ्यांना कृषी पुरक उद्योग व उत्त्पन्न मिळू शकते त्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)