सुधारणांनंतर जीएसटी संकलन वाढेल – रघुराम राजन

        नोटाबंदी अगोदर योग्य गृहपाठाची आवश्‍यकता होती

न्यूयॉर्क – भारतासारख्या मोठ्या देशात जीएसटी लागू करण्यात आला आहे. त्याता काही अडथळे येत आहेत. त्यामुळे कर संकलन अपेक्षेइतके होत नाही. त्यात काही सुधारणा केल्यास ती यंत्रणा अधिक कार्यक्षम होईल. त्या सुधारणा शक्‍य असल्याचे रिझर्व्ह बॅकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले आहे.जर या सुधारणा अधिक चांगला गृहपाठ करून केल्या असत्या तर त्याचे परिणाम अधिक चांगले दिसून आले असते. हॉर्वर्ड केनेडी स्कूल येथे दिलेल्या व्याख्यानात त्यांनी सांगितले, की सरकार जीएसटी त्रुटीहिन करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आगामी काळात त्याची अंमलबजावणी अधिक सुबक होऊन कर संकलन वाढण्याची शक्‍यता आहे.

नोटाबंदीबाबत सरकारने तेव्हा रिझर्व्ह बॅंकेला विचारात घेतले होते का असे विचारले असता त्यांनी सांगितले की, सरकारने रिझर्व्ह बॅंकेकडे तशी विचारणा केली होती. चलनातील 87.5 टक्‍के नोटा अचानक काढून घेणे ही योग्य कल्पना नसल्याचे बॅंकेने सरकारला सांगितले होते. त्यावेळी राजन रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर होते. जर जेवढे चलन काढून घेतले जाणार आहे तवढेच नवे चलन तयार ठेवले नाही तर त्याचा स्थूल अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होईल, असे आपण सरकारला सांगितले होते. मात्र तसे न करता नोटाबंदी केल्यामुळे त्याचा लोकांच्या रोजगारावर व अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाल्याचे ते म्हणाले. देशातील आणि परदेशातील काही नकारात्मक कारणामुळे लघु आणि मध्यम पल्ल्यात काही अडचणी आल्या तरी दीर्घ पल्ल्यात भारतीय अर्थव्यवस्था उत्तम कामगिरी करणार आहे. याबाबत कोणालाही शंका नसल्याचे राजन यांनी यावेळी बोलताना सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)