सुधन्वा गोंधळेकरच्या पुण्यातील घरात सापडला मोठा शस्त्रसाठा

सोलापूर, साताऱ्यातही एटीएसची छापेमारी 


12 जणांना घेतले ताब्यात


 नालासोपाऱ्यात स्फोटके सापडल्याचे प्रकरण

पुणे- मुंबईतील नालासोपऱ्यात जप्त करण्यात आलेल्या स्फोटक प्रकरणात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुणे, सातारा, सोलापूर भागांतून बारा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून एका पथकाने गोंधळेकर याच्या पुण्यातील घरी छापेमारी केली. यामध्ये तब्बल दहा पिस्तूले, गावठी कट्टा, चाकू आणि चॉपर मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. मागील तीन ते चार दिवसांपासून एटीएसची पथके शहरात “सर्च ऑपरेशन’ राबवत आहेत.

राज्य दहशतवाद विरोधी पथकाने गुरूवारी रात्री केलेल्या धडक कारवाईत नालासोपारा भागातील वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर यांना अटक केली. राऊत याच्या घरातून वीस गावठी बॉम्ब, स्फोटके, बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. राऊतच्या संपर्कात असलेल्या सोळा जणांची एटीएसकडून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, पुणे, सातारा, सोलापूर भागांतून एटीएसच्या पथकाने बारा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यातील दोघे जण पुण्यातील कोंढवा व पर्वती परिसरात वास्तव्यास असल्याचे समजते. एटीएसकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी राऊत आणि त्याचे साथीदार मुंबई, पुणे, सोलापूर भागांत घातपाती कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा संशय एटीएसने व्यक्त केला आहे.
दरम्यान, हे “ऑपरेशन’ अतिशय गुप्तरित्या राबविण्यात येत असून त्याची कोणतीच माहिती पुणे पोलिसांना देण्यात आलेली नाही. त्यांच्याकडून पुण्यात काही घातपात घडवण्यात येणार होता का? याची माहिती एटीएसकडून घेतली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

गोंधळेकर पुण्यात ग्राफिक डिझायनर
गोंधळेकर हा मूळचा साताऱ्यातील आहे. त्याचा पुण्यात ग्राफिक डिझायनिंगचा व्यवसाय असल्याची माहिती मिळाली आहे. राऊत, कळसकर, गोंधळेकर हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत. दरम्यान, राऊत, कळसकर, गोंधळेकर यांच्या संपर्कात असलेल्या बारा जणांना मुंबई एटीएसने शनिवारी ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेले राऊत, कळसकर, गोंधळेकर यांना न्यायालयाने 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, बंगळुरुतील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या अनुषंगाने राऊत, कळसकर, गोंधळेकर यांची चौकशी केली जाणार आहे.

 

जप्त केलेला शस्त्रसाठा (संख्या)
गावठी पिस्तूल मॅगझीनसह-10 , गावठी कट्टा-1, एअर गन^1), पिस्तूल बॅरल-10, अर्धवट तयार पिस्तूल-6, पिस्तूल मॅगझीन-6), अर्धवट तयार मॅगझीन-3, अर्धवट तयार पिस्तूल स्लाईड -7, रिले स्विच-16, वाहनांच्या नंबरप्लेट-6, ट्रिगर मॅगझिन-1, चॉपर-1 आणि स्टील चाकू जप्त करण्यात आले आहेत. याबरोबरच पेनड्राइव्ह, हार्डडिस्क, मेमरी कार्ड आदी जप्त करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)