सुधन्वाच्या घरावर पोलिसांची नजर

चौकशीसाठी पोलिसांची पथके दाखल
सातारा,  (प्रतिनिधी)
नालासोपारा येथे सापडलेल्या स्फोटकांच्या साठा प्रकरणी एटीएसने साताऱ्यातील सुधन्वा गोंधळेकरला अटक केली . त्या नंतर त्याच्या घराकडे पोलिसांसह अनेकांनी चौकशीसाठी धाव घेतली. त्यावेळी चौकशीचा ससेमिरा चुकविण्यासाठी सुधन्वाचे मित्र आणि नातेवाइकांनी त्याच्या घराभोवती बंदोबस्तासाठी कडे केले आहे. सातारा पोलिस सुधन्वाच्या घरावर बारीक नजर नजर ठेवून आहेत.
एटीएसने वैभव राऊत आणि शरद कळसकर यांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीतून साताऱ्यांतील करंजे पेठेमध्ये राहणाऱ्या सुधन्वा गोंधळेकरचे नाव समोर आले. त्यानंतर एटीएसने सुधन्वावर पाळत ठेवून त्याला पुण्यातून अटक केली. बॉम्बच्या साठाप्रकरणात गोंधळेकरला अटक झाल्याचे समजताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गोंधळेकरच्या घराकडे धाव घेतली. तसेच गोपनीय विभाग, क्राईम ब्रॅंचचे अधिकारीही चौकशीसाठी त्याच्या घरी गेले . शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत पोलिसांची वर्दळ गोंधळेकरच्या घराजवळ होती. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा चुकविण्यासाठी गोंधळेकरचे मित्र आणि नातेवाईक घराजवळ ये-जा करणाऱ्या व्यक्तींवर बारीक नजर ठेवून होते. वडील, आई, पत्नी व दोन लहान मुली असा त्याचा परिवार आहे. सुधन्वा हा उच्चशिक्षित असून त्याचा ग्राफिक्‍सचा व्यवसाय आहे. साताऱ्यातील कमानी हौद, हेरंब प्राईड व पुण्यातील मित्र मंडळ चौकात त्याची कार्यालये आहेत. कॅड कॉईन नावाची ग्राफिक्‍स कंपनी तो चालवत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.सुधन्वा हा शिवप्रतिष्ठानच्या सर्वच मोहिमात ÷अग्रभागी असायचा, अशी माहिती पुढे येत आहे. सुधन्वा काही दिवसांपासून कुणाशीच काही बोलत नव्हता . त्यामुळे तो नक्की काय करतो , कुठे जातो याची काहीच कल्पना त्याच्या कुटुुंबियांना नसल्याचे सांगण्यात येते. मात्र या सगळ्या प्रकारामुळे त्याचे कुटुंबीय पुरतेच गोंधळुन गेले आहेत.
———————————————————————————
सातारा पोलिसांचा कस लागणार?
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर एटीएसच्या राडारवर असलेला सातारा पुन्हा एकदा घातपाताच्या चर्चेने रडारवर आला आहे. डॉ. दाभोलकर प्रकरणानंतर साताऱ्यातील अनेकांना एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतर आता सुधन्वा गोंधळेकर याला घातपाताच्या आरोपाखाली अटक झाल्याने सातारा पोलिसांचा पुढील काळात कस लागणार असल्याची चर्चा आहे.
————————————————————————-
सुधन्वाचे मित्र आऊट ऑफ कव्हरेज..
सुधन्वाचे साताऱ्यात बरेच मित्र आहेत. त्यांच्याकडून सुधन्वाची आणखी काही माहिती मिळते काय , याची सातारा पोलीस चाचपणी करत आहेत. मात्र, त्याचे मित्र साताऱ्यांतून गायब झाले असून, अनेकांचे मोबाईल आऊट ऑफ कव्हरेज असल्याचे समोर आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)