सुद्रिकेश्वर मंदिराच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई

नियोजित प्रमाणेच काम होणार
श्रीगोंदे – तालुक्‍यातील पारगाव येथील सुद्रिकेश्वर मंदिराचे जिर्णोद्धारचे काम ठरलेल्या नियोजनाप्रमाणेच काम करण्यात येईल. कोणीही या कामात अडथळा निर्माण करणार नाही. अडथळा निर्माण केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा बाजीराव पोवार यांनी दिला आहे.
पारगावमधील सुद्रिकेश्वर मंदिर येथील मंदिराचे जीर्णोद्धारचे काम चालू आहे. हे काम करण्यावरून गावातील ग्रामस्थ व सरपंच यांचा वाद बऱ्याच दिवसांपासून चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर पोवार यांनी आज बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. 2 ऑक्‍टोबर 2018 रोजी मंदिराचे काम करणारे मजूर यांचे राहते खोल्यावर काही अज्ञात लोकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. तसेच काल (दि. 3) गावच्या सरपंचांनी हे काम करणाऱ्या ठेकेदारास काम बंद करण्याबाबत नोटीस दिली. त्यावरून गावात चांगलाच वाद सुरू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोवार यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली.
या बैठकीत ठरलेल्या नियोजना प्रमाणेच काम करण्यात येईल. यावर एकमत झाले. त्यानुसार मंदिराच्या कामास सुरवात झाली असल्याचे पोवार यांनी सांगितले. या बैठकीस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)