सुदेश शेलार स्मृती राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा आजपासून

ऍन्थनी अमलराज, सुतीर्था मुखर्जी यांना अग्रमानांकन

पुणे: सुदेश शेलार मेमोरियल फाऊंडेशन व डेक्‍कन जिमखाना यांनी संयुक्‍तपणे आयोजित केलेल्या सहाव्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक-11स्पोर्टस राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पीएसपीबीच्या ऍन्थनी अमलराजला पुरुष एकेरीचे, तर एचआरएनच्या सुतीर्था मुखर्जीला महिला एकेरीचे अग्रमानांकन देण्यात आले आहे.

याशिवाय 21 वर्षांखालील मुलांच्या गटात एचआयएनच्या जित चंद्रा तर 21 वर्षांखालील मुलींच्या गटात आरबीआयच्या अकुला श्रीजा यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे. पुरुष गटात पीएसपीबीच्या सुधांशू ग्रोवरला दुसरे, तर एएआयच्या अर्जुन घोषला तिसरे मानांकन देण्यात आले आहे. महिला गटात पीएसपीबीची स्टार खेळाडू मनिका बात्रा व पूजा सहस्त्रबुध्दे याना अनुक्रमे दुसरे व तिसरे मानांकन देण्यात आले आहे.

ही स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये उद्यापासून (शुक्रवार) सुरू होणार आहे. पुरुष व महिला खुल्या गटासह 12, 15, 18 व 21 वर्षांखालील विविध गटांत होणाऱ्या या स्पर्धेत देशभरांतून 1200 हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. 11स्पोर्टसच्या विता दाणी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन व आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे.

गटवार मानांकन यादी-
पुरुष गट-1. ऍन्थी अमलराज (पीएसपीबी), 2. सुधांशू ग्रोवर (पीएसपीबी), 3. अर्जुन घोष (एएआय), 4. सनिल शेट्टी( पीएसपीबी),5. श्रीराम सुष्मित (एएआय), 6. सिद्धेश पांडे (एमएचआरबी), 7. मनुष शहा (गुजरात) व 8. हरमीत देसाई (पीएसपीबी),
महिला गट- 1. सुतीर्था मुखर्जी (एचआरएन), 2. मनिका बात्रा (पीएसपीबी), 3. पूजा सहस्त्रबुद्धे (पीएसपीबी), 4. मधुरिका पाटकर (पीएसपीबी), 5. दिव्या देशपांडे (पीएसपीबी), 6. अहियाका मुखर्जी (आरबीआय), 7. सागरिका मुखर्जी (आरएसपीबी) व 8. प्राप्ती सेन (पश्‍चिम बंगाल),
21 वर्षांखालील मुले- 1. जित चंद्रा (एचआयएन), 2. अनिरभ घोष (आरएसपीबी), 3. पार्थ विरमानी (डीएलआय), 4. सिद्धेश पांडे (एमएचआर बी), 5. अभिमन्यू मित्रा (आयए ऑड एडी), 6. मानुष शाह (गुजरात), 7. आनंत देवराजन (तमिळनाडू) व 8. सोहम भट्टाचार्य (सीबी),
21 वर्षांखालील मुली- 1. अकुला श्रीजा (आरबीआय), 2. सेलेनेदिप्ती सेल्वाकुमार (एएआय), 3. श्रृती अमृते (आरएसपीबी), 4. प्राप्ती सेन (पश्‍चिम बंगाल), 5. याशिनी शिवशंकर (तमिळनाडू), 6. मौमिता दत्ता (एएआय), 7. वंशिका भार्गव (डीएलआय) व 8. कौशानी नाथ (एएआय),


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)