सुदुंबरे, जांबवडे ग्रामपंचायत बिनविरोध

  • 27 जागांसाठी 55 उमेदवार रिंगणात

तळेगाव स्टेशन – मावळ तालुक्‍यात सात ग्रामपंचायतींपैकी सुदुंबरे, जांबवडे ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या. कल्हाटच्या सरपंचासह 9 जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित 27 जागांसाठी 55 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती तहसीलदार रणजीत देसाई व नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांनी दिली.

आंदर-मावळातील सुदुंबरे, जांबवडे, कल्हाट, ओव्हळे, दिवड, सुदवडी, कोंडीवडे ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. तसेच कल्हाटच्या सरपंचासह 7 पैकी 5 जागा बिनविरोध झाल्या. 2 जागांसाठी चार जण रिंगणात आहेत. ओव्हळे व कोंडीवडेच्या एकूण 27 जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे ओव्हळे, दिवड, सुदवडी, कोंडीवडेच्या सरपंच व सदस्य पदासाठी दि. 27 रोजी मतदान होणार आहे. दि. 28 रोजी वडगाव-मावळ महसूल भवन येथे मतमोजणी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)