सुदर्शननगर चौकात “ग्रेड सेपरेटर’

पिंपरी – पिंपळे गुरव येथील सुदर्शननगर चौकात महापालिकेच्या वतीने 335 मीटर लांबीचा ग्रेड सेपरेटर उभारला जाणार आहे. यासाठी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत 27.86 कोटीच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. हा ग्रेड सेपरेटर नाशिकफाटा – वाकड बीआरटीएस रोडला जोडला जाणार आहे.

महापालिकेने हे काम व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्‍चर इंडिया या कंपनीला दिले आहे. संबंधीत कंपनीने येत्या 18 महिन्यात काम करणे अपेक्षीत आहे. या कामासाठी 8 जानेवारी रोजीच मंजुरी मिळाली होती. यावेळी हे काम 25 कोटी 57 लाख रुपये होते. मात्र योग्य कंत्राटदार न मिळाल्यामुळे वाढीव दरासह हे काम 27 कोटी 86 लाख 93 हजार 249 रुपयांना संबंधीत कंत्राटदाराला देण्यात आले आहे. शहरातील हा चौथा ग्रेड सेपरेटर असेल. यामुळे पिंपळे गुरव परिसर शहरातील नागरिक वाकड किंवा हिंजवडीकडे वेगाने जाऊ शकतील.

यापूर्वी महापालिकेने डांगे चौक येथील चिंचवड व आकुर्डी या परिसराला हिंजवडी परिसराशी जोडणाऱ्या ग्रेडसेपरेटरला मंजुरी दिली आहे. त्याच स्वरुपाचा हा देखील ग्रेड सेपरेटर असणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपुलापाठोपाठ शहरात ग्रेड सेपरेटर उभारण्यावर महापालिकेने भर दिला आहे. यामुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटेल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

कसा असेल “ग्रेड सेपरेटर’?
लांबी 335 मी.
रुंदी 24.2 मी.
दोन्ही बाजूला 3.5 मीटर बीआरटीएस रस्ता
दोन्ही बाजूला 7.5 मीटर “सर्व्हिस लेन’
दोन्ही बाजूला 1.8 मीटरचा पादचारी मार्ग
दोन्ही बाजूला 2 मीटरचा सायकल ट्रॅक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)