सुट्ट्यांच्या मुहूर्तावर जेजुरीत गर्दी

संग्रहित छायाचित्र

जेजुरी- दिवाळीची सुट्टी आणि लगतच आलेला दुसरा शनिवार आणि रविवार या सुट्टींचे औचित्य साधून दोन दिवसांमध्ये सुमारे दीड लाख भाविकांनी जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले. दिवाळी, भाऊबीज संपताच जेजुरी नगरीत भाविकांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. हॉटेल, लॉज, भाविकांच्या निवासामुळे फुल्ल झाली होती. शनिवार, रविवार पुणे-पंढरपूर राज्यमार्गावरील शहरातील मुख्य चौकांमध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्यामुळे पोलीस प्रशासनावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मोठा ताण पडला. मोरगाव रस्त्यावर सुमारे दीड ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांग लागल्या होत्या. बसस्थानकावरही भाविकांची गर्दी दिसून आली. जादा बसगाड्या नसल्याने राज्यमार्गावर मिळेल त्या वाहनाला हात करून भाविक प्रवास करताना दिसून येत होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत जेजुरीत वाहतूक कोंडी कायम होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)