सुट्टीवर आलेल्या लष्करी जवानाची आत्महत्या

जेजुरी- जेजुरी जवळील धालेवाडी येथील रहिवासी असलेल्या एका लष्करी सेवेतील जवानाने कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. 6) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव चेतन महेश रणदिवे (वय 23, रा. धालेवाडी ता. पुरंदर) आहे. रात्री उशीरापर्यंत आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत महेश संपत रणदिवे यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार चेतन रणदिवे लष्करी सेवेत कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच ते सुट्टी घेऊन आपल्या गावी धालेवाडी येथे आले होते. सुट्टी संपत आल्याने पुन्हा लष्करी सेवेत रूजू होण्याची ते तयारी करीत होते. त्यासाठी त्यांनी आपल्या बॅगाही भरल्या होत्या. रविवारी (दि. 5) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दुचाकी घेऊन ते बाहर निघून गेले. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने घरातील व्यक्तींनी बेपत्ता झाल्याची खबर पोलिसांत दिली. सोमवारी सकाळी वैभव रणदिवे यांना चेतन रणदिवे हे कडेपठार डोंगराच्या पायथ्याला असलेल्या एका शाळेजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. डॉक्‍टरांनी तपासणी केली असता त्यांनी कीटकनाशक प्राशन केल्याचे स्पष्ट झाले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार चंद्रकांत सातभाई पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)