सुट्टीवर आलेल्या जवानाचा शॉक लागून मृत्यू

चरेगाव येथील घटना : गावावर शोककळा
कराड/उंब्रज, दि. 13 (प्रतिनिधी) :
चरेगाव, ता. कराड येथील सुट्टीवर आलेल्या जवानाचा घरातील नळाची मोटर जोडत असताना जोरदार शॉक बसून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी सव्वा सात वाजण्याचे सुमारास घडली. अमोल कृष्णत माने (वय 29 वर्षे) असे मृत जवानाचे नाव आहे. या घटनेने चरेगावावर शोककळा पसरली आहे.
चरेगाव, ता. कराड येथील अमोल कृष्णत माने हे दहा वर्षापासून भारतीय सैन्य दलात जम्मू काश्‍मीर येथील श्रीनगरमध्ये 13 ऐन्डी रेजीमेंट राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होते. दि. 22 मे पासून ते एक महिन्याचे सुट्टीवर गावी आले होते. अजूनही सुट्टीचे काही दिवस बाकी असताना बुधवारी सकाळी सव्वा सात वाजण्याचे सुमारास पाणी भरण्यासाठी त्यांनी नळाची मोटर सुरु केली. यावेळी मोटरला स्पर्श झाल्याने त्यांना जोरदार शॉक बसला. यामधून त्यांनी निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अपयशी ठरल्याने त्यातच त्यांचा र्दुदैवी मृत्यू झाला.
एकुलते एक असलेले जवान अमोल माने यांचा चारच वर्षापूर्वी विवाह झाला होता. 9 जून रोजी त्यांनी स्वत:चा वाढदिवस कुटुंबिय व मित्रमंडळींसोबत साजरा केला. तसेच त्यांच्या पत्नीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम गुरुवार, दि. 14 रोजी होणार होता. यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र या जवानाच्या र्दुदैवी जाण्याने माने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्‍चात पत्नी, बहीण, आई, वडील असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वानाच धक्का बसला असून घटनेची माहिती मिळताच गावकरी तसेच परिसरातील ग्रामस्थांनी अंत्यदर्शनासाठी माने यांच्या घराभोवती गर्दी केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)