सुट्टीत तंदुरुस्त राहण्यासाठी…

व्यायामातून सुट्टी घेण्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांवर पाणी पडते. तुम्ही एक आठवड्याहून अधिक काळासाठी सुट्टीतील पर्यटनाचे नियोजन करत असाल तर तंदुरुस्तीसाठी पुढील कानमंत्र लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी जात असाल तेथे उपलब्ध असणाऱ्या सुविधांनुसार व्यायामाचेही नियोजन करा.

समुद्रकिनारा – धावणे (जॉगिंग), व्हॉलिबॉल, पोहणे हा व्यायाम करा.
उद्याने – सायकलिंग करा.
तलाव – नौकानयन करा.
जंगल – निसर्गभ्रमण करा.
पर्वत – पदभ्रमण करा.
शहर – हवामान अनुकूल असेल तर शक्‍य तेवढे चाला.

पर्यटनातील तुमच्या कृतींचे नियोजन आधीच करा.
संबंधित व्यायामासाठीची आवश्‍यक साधने बरोबर ठेवा.
ज्या हॉटेलमध्ये उतरला असाल तेथील जिम किमान दहा दिवसांत एक सत्रासाठी वापरा किंवा शरीर वजन संतुलनाचे व्यायाम खोलीत करा. मात्र जवळ रेझिस्टन्स बॅंड असू द्यात.
पर्यटनस्थळी स्पामध्ये वेळ ठरवून घेण्यास विसरू नका.

श्‍वेता भाटीया


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)