मुंबई : सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम जोरात सुरू आहे. परीक्षा संपल्यानंतर आता पर्यटन करणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. यात देशभरातील अनेक ठिकाणे असली, तरी समुद्राचे फेसाळते पाणी आणि उंच लाटा अनुभवण्याची संधी तुम्ही नक्कीच अनुभवा. यात देशभरातील असंख्य प्रेक्षणीय समुद्रकिनारे तुमची वाट पाहत आहेत. त्यांची ही माहिती खास वाचकांसाठी..

कोवालम बीच : तिरुवनंतपूरमपासून १८ किलोमीटर अंतरावर हा बीच आहे. इथे येऊन लोक भरपूर आनंद लुटतात.

राधा नगर बीच : अंदमानमध्ये हा बीच असून ज्या लोकांना शांतता हवी आहे त्यांच्यासाठी राधा नगर बीच उत्तम पर्याय आहे.

उल्लाल बीच : कर्नाटकात मंगलोर, उल्लाल, देवबाग आणि गोकरणा बीच आहेत. यापैकी उल्लाल बीच फेमस आहे.

कलंगुट बीच : गोव्यातील कलंगुट बीच भरपूर फेमस असून इथे वर्षाचे बाराही महिने गर्दी असते. इथे तुम्ही वॉटर स्पोटर्स आणि पॅराग्लायडिंगचा आनंद लुटू शकता.

जुहू बीच : मुंबईतला जुहू समुद्र किनाराही प्रसिद्ध आहे. मुंबई फिरायला येणारे बहुसंख्य पर्यटक हमखास या समुद्र किनाऱ्याला भेट देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)