सुट्टया संपल्याने बसस्थानकात गर्दी

तिकिट बुकिंगसाठी चाकरमान्यांच्या लांबच रांगा

सातारा – गेले चार दिवस दिपवली सुट्टीसाठी गावी आलेले चाकरमानी पुण्या-मुंबईला तसेच शहरांमध्ये रवाना होवू लागले आहे. यामुळे सातारा बसस्थानकांमध्ये प्रवाशांची तोबा गर्दी होवू लागली आहे. रविवारी तिकिटांसाठी बुकिंगच्या खिडक्‍यांसमोर चाकरमानी तसेच प्रवांशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

-Ads-

सातारा येथील बसस्थानक दिवाळी सुट्ट्या संपल्याने गजबजू लागले आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे एसटीने जादा फेऱ्या सुरू केल्या आहेत. तथापि, सोमवारी कामावर रुजू होण्यासाठी रविवारी मोठ्या संख्येने चाकरमान्यांची सातारा तसेच जिल्ह्यातील इतर बसस्थानकांवर मोठी गर्दी झाली होती. तिकिटांसाठी आरक्षण करण्यासाठी बुकिंग खिडकीजवळ लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

पुणे-स्वारगेटला जाणाऱ्या प्रवाशांची रांग बसस्थानकाच्या आऊटगेट पर्यंत आली होती. तसेच गर्दी वाढू लागल्यानंतर अनेकांनी खाजगी बसगाड्यांनी प्रवास करणे पसंत केले. तथापि, खाजगी बसगाड्यांमध्येही अव्वाच्या सव्वा दर सांगितला जात असल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, सणासुदीसाठी बाहेरगावी गेलेले प्रवासीही साताऱ्यात परतू लागल्याने सातारा बसस्थानक गजबजले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)