सुगम गीत गायनात कराडची श्रेया भांबुरे प्रथम

कराड – कराड जिमखान्याच्यावतीने जिल्हास्तरीय शालेय तबला वादन व सुगम संगीत गीत गायन स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेमध्ये सातारा, कोरेगाव, पाटण, मसूर आदी ठिकाणच्या शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग होता. उद्‌घाटन संस्थेचे अध्यक्ष महेंद्रकुमार शाह, जनरल सेक्रेटरी सुधीर एकांडे व उपस्थित मान्यवर परीक्षकांच्या हस्ते नटराजाचे पूजन करुन झाले.
यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात शालेय स्तरावर अनेक उपक्रम सातत्याने राबविणाऱ्या जिमखान्याने साहित्य संमेलन, प्रीतिसंगम संगीत महोत्सव, पक्षीमित्र संमेलन, लोककला संमेलन, रणजी सामन्यांसारख्या मोठ्या उपक्रमांचे नेटके आयोजन करुन कराडच्या सांस्कृतिक क्षेत्राचा राज्यात लौकिक वाढविला असल्याचे सांगितले.

तबला वादन स्पर्धेत लहान गटात प्रथम रुजुल दडगे, व्दितीय अनिकेत सवदीकर, तृतीय जय कुलकर्णी, मोठ्या गटात प्रथम ओम जाधव, व्दितीय अभिजित तडाखे, तृतीय मिहीर तळवलकर, गीत गायन स्पर्धा लहान गटात प्रथम अस्मिता पावनगडकर, व्दितीय वेदा रसाळ, तृतीय रेवा कुलकर्णी, मोठ्या गटात प्रथम श्रेया भांबुरे, व्दितीय प्रिया कुलकर्णी, तृतीय मिताली जाधव यांनी यश मिळवले. तबला वादन स्पर्धेसाठी नितिन पंडीत व निलेश कुलकर्णी यांनी तर गीत गायन स्पर्धेसाठी मधुरा व भैरवी किरपेकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देवून स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. प्रमोद गरगटे, दिलीप आगाशे, दिपक शहा, श्रीकांत इनामदार, नंदा जोशी, शंकरराव चव्हाण, विवेक कुंभार या सभासदांमुळे स्पर्धा अत्यंत यशस्वीपणे पार पडली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कला विभागप्रमुख दिलीप आगाशे यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष महेंद्रकुमार शाह यांनी केले. सुधीर एकांडे यांनी स्वागत करून आभार मानले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)