“सुगंधी’ करिअरवाट

जर आपण सुगंधी अत्तराचे चांगले जाणकार असाल तर आपल्याला परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये परफ्युमर किंवा फ्रॅग्रेन्स केमिस्ट म्हणून रोजगाराची चांगली संधी मिळू शकते. अत्तराचा वापर हा मेसोपोटमियन काळातील नागरिकांपासून होत असल्याचे सांगितले जाते. हजारो वर्षांनंतरही अत्तराचे महत्त्व अद्याप कमी झालेले नाही. याउलट या व्यवसायात आमुलाग्र बदल झाले आहेत. या क्षेत्रात युवकांसाठी करियरचे नवीन कवाडे खुलली गेली आहेत. जर आपल्यालाही अत्तराचा शौक आहे, सुवासिक वासाची आवड आहे तर आपणही यशस्वी परफ्युमर किंवा फ्रॅग्रेन्स केमिस्ट म्हणून वावरू शकता.

अपर्णा देवकर

तसे पाहिले तर आतापर्यंत लोक अत्तर किंवा सुगंधित वस्तुंचा व्यवसाय हा हौसेखातर किंवा वडिलोपार्जीत करत असत. मात्र बाजारात वाढत्या ब्रॅंडस, स्पर्धा पाहता या उद्योगाचे स्वरुप बदलले गेले आहे. जर आपल्याला देखील सुवासिक पदार्थाची चांगली जाण आहे, तर आपणही या क्षेत्रात करियर करू शकता. करियर कौन्सिलर डॉ. अनुभूती सेहगल यांच्या मते, सध्याच्या काळात देश-विदेशात सुगंधित अत्तराला चांगली मागणी आहे. आजकाल बाजारात विविध प्रकारचे अत्तर येत आहेत. अत्तरापासून वेगवेगळा सुगंध तयार करणाऱ्याला प्रोफेशनल्स परफ्यूमर्स असे म्हटले जाते. हे फ्रॅगन्स प्रॉडक्‍शनमध्ये विशेष भूमिका बजावतात. एखादे अत्तर तयार करताना त्याची गुणवत्ता राखण्यासाठी परफ्यूमर दक्ष असतात. एखादा फ्लेवर तयार करण्यासाठी कोणकोणत्या घटकांची गुणद्रव्याची गरज असते, हे परफ्युमर पाहतात.

प्रमुख संस्था
इिंन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉलॉजी, मुंबई
व्हिींजी वझे कॉलेज ऑफ आटर्स, सायन्स अँड कॉमर्स, मुंबई;
फ्रिँगन्स अँड फ्लेवर डेव्हलमेंट सेंटर, कन्नोज
मिुंबई विद्यापीठ, मुंबई

परफ्यूमर कोण असतात?
अत्तराचे कॉम्पेजिशन आणि त्याची फ्लेवरिंग तयार करणाऱ्या तज्ञाला परफ्यूमर असे म्हणतात. फ्रॅगन्स प्रॉडक्‍शनमध्ये त्याची भूमिका महत्त्वाची असते. हे अत्तरात वापरण्यात येणाऱ्या पदार्थाची गुणवत्ता आणि प्रभाव ओळखून नवीन ऍरोमा फॉर्म्यूला तयार करतात. एवढेच नाही तर अत्तरासाठी प्रत्येक प्रकारचे प्रॉडक्‍ट जसे की एअर फ्रेशनर्स, रुम फ्रेशनर्स, अँटीपरस्मिरेंटस, लॉंड्री आणि क्‍लिनिंग प्रॉडक्‍टस, पर्सनल केअर प्रॉडटक्‍स आदींसाठी ऍरोमा फॉर्म्यूला तयार केला जातो. त्यांना फ्रॅगन्स केमिस्ट असेही म्हटले जाते.

आवश्‍यक अभ्यासक्रम
या उद्योगात करियर करण्यासाठी इंटरमीडिएटमध्ये रसायनशास्त्र असणे गरजेचे आहे. त्यानंतर रसायनशास्त्रातून बीएसएसी किंवा एमएससी करणे अनिवार्य ठरते. याशिवाय आपण परफ्यूमरी अँड फ्लेवर्स टेक्‍नॉलॉजीत मास्टर्स, टेक्‍नॉलॉजी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम इन ऍरोमा मॅनेजमेंट, अरोमा टेक्‍नॉलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्यूएशन, परफ्युमरी अँड कॉस्मेटिक मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्यूएट करू शकता.

परफ्यूमरचे काम
परफ्यूमर हे प्रामुख्याने प्रॉडक्‍टमध्ये सुगंध निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध घटक पदार्थाची केमिकल टेस्टिंग करतात. जेणेकरून त्याची गुणात्मकता आणि प्रमाण निश्‍चित करता येईल. याशिवाय पर्यावरण आणि गुणवत्तासंबंधी निश्‍चित केलेले निकषांचे देखील पालन करता येईल. जॉब ड्यूटीत रेडीमेड मटेरियलची गुणवत्ता निश्‍चित करणे, डेडलाइन्स लक्षात घेऊन उत्पादनाची प्राथमिकता निश्‍चित करणे, गरजेप्रमाणे ऍरोमाच्या फॉर्म्यूलात बदल करणे गुण विशेष जसे की बॉडी, हार्मोन स्ट्रेंथ, परमानन्स आदीनुसार सुगंधाची पडताळणी करणे, या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. प्रारंभीच्या काळात वीस ते पंचवीस हजार रुपये मासिक वेतन मिळते.

व्यक्तिगत कौशल्य
एक उत्तम परफ्युमर होण्यासाठी सेन्स ऑफ स्मेल असणे अत्यंत गरजेचे आहे. याशिवाय आपण वेगवेगळे सुंगध आकर्षितरित्या सादर करणे, चांगली स्मरणशक्ती, प्रयोगशाळा कौशल्य, संवाद कौशल्य, चांगले लिखाण, टाइम मॅनेजमेंट, टीम वर्किंग स्किल्स, धाडस आदी गुण अंगी असणे आवश्‍यक आहे.

भविष्यातील संधी
आपण मोठमोठ्या परफ्यूम हाऊसेस किंवा कंपनीत क्रिएटिव्ह, ऍप्लिकेशन किंवा मूल्यमापन विभागात काम करू शकतात. याशिवाय आपण फूड अँड ब्रेव्हरेज, टी अँड वाईन आणि कॉस्मेटिक इंडस्ट्रीत देखील काम करू शकता. प्रारंभीच्या काळात वीस ते पंचवीस हजार आरामात वेतन मिळू शकते. तर क्रिएटिव्ह डिपार्टमेंटमध्ये परफ्युमर काही वर्षाच्या अनुभवाच्या जोरावर मासिक 60 ते80 हजार रुपयांचे वेतन मिळवू शकतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)