“सुखोई-30 एमकेआय’ हवाई दलाच्या ताब्यात

संपूर्ण दुरुस्ती आणि अद्ययावतीकरण प्रयत्न यशस्वी


हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स आणि हवाई दलाचे यश

पुणे – हवाई दलाच्या ताफ्यात प्रथमच देशात संपूर्णपणे दुरुस्तीकरण आणि अद्ययावत करण्यात आलेल्या “सुखोई-30 एमकेआय’ हे लढाऊ विमान सेवेसाठी दाखल झाले आहे. नाशिकमधील ओझर येथील 11 बेस रिपर डेपो येथे झालेल्या एका औपचारिक सोहळ्याद्वारे हे लढाऊ विमान हवाई दलाच्या लढाऊ तुकडीकडे सुपुर्द करण्यात आले. भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानांच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण क्षण असल्याचे हवाई दल प्रशासनाने म्हटले आहे.

हवाई दलातील लढाऊ विमानांची दुरूस्ती हा अत्यंत महत्वाचा भाग असतो. ही विमाने इतर देशांकडून विकत घेतल्याने विशेषत: या विमान कपन्यांचे इंजिन आणि सॉफ्टवेअर दुरूस्ती ही अत्यंत किचकट काम असते. मात्र, सुखोई या लढाऊ विमानांची केवळ दुरूस्तीच न करता त्याची क्षमता वाढवत हे लढाऊ विमान अद्ययावत करण्यात हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स आणि हवाई दल यांना मोठे यश मिळाले आहे. ओझर येथील 11 बेस रिपेअर येथे झालेल्या हवाई दलाच्या एका औपचारिक सोहळ्यात डेपोच्या दुरुस्ती विभागाचे प्रमुख एअर मार्शल हेमंत शर्मा यांच्या हस्ते हवाई दलाच्या साऊथ-वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख एअर मार्शल एच. एस. अरोरा यांना सुपुर्द करण्यात आले. याप्रसंगी हवाई दल, डीआरडीओ, एचईल अशा विविध संरक्षण संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत एअर कमांडर समिर बोराडे म्हणाले, “11 बेस रिपेअर डेपो आणि हिंदुस्थान एरोनोटिक्‍स यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या कामाचे हे यश आहे. भारतीय हवाई दलासाठी हे केंद्र सक्षमपणे काम करत असून, आगामी काळातही लढाऊ विमानांशी संबंधित विविध कार्ये यशवीपणे पार पाडण्याचा आमचा मानस आहे. त्या उद्देशाच्या पूर्तीसाठी हे यश अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल.”

संपूर्णपणे भारतात दुरूस्ती झालेले हे लढाऊ विमान भारतीय हवाई दलासाठी एक महत्त्वपूर्ण बाब ठरणार आहे. सुखोईच्या अद्ययावतीकरणामुळे या लढाऊ विमानांची क्षमता वाढली आहे. तसेच यामुळे सुखोई विमानाच्या कार्यक्षमतेत निश्‍चितच वाढ झाली आहे.
– भूषण गोखले, एअर मार्शल (नि.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)