‘सुई धागा-मेड इन इंडिया’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

बाॅलिवूड अभिनेता वरूण धवन याने अनेक एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. वरूण धवनने स्टुडंट आॅफ द इयर, मैं तेरा हिरो, बदलापूर, बद्रीनाथ की दुल्हनिया असे एकापेक्षा एक हिट हिंदी चित्रपटात काम केले आहे. नुकताच त्याच्या जुडवा 2 या चित्रपटाला देखील सिनेरसिकांनी चांगलीच पसंती दिली होती.

जुडवा-2 यानंतर वरूण धवन आता सुई धागा मेड इन इंडिया या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे. त्याबरोबरच 13 आॅगस्ट ला ट्रेलर प्रदर्शित होईल असेही म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वरूण धवनने पोस्टरबरोबर  #SuiDhaagaMadeInIndia  असा हॅशटॅग सुध्दा सुरू केला आहे. या पोस्टरमध्ये त्याच्यासोबत अनुष्का शर्मा ही झळकत आहे. चित्रपट 28 सप्टेंबरला प्रदर्शित होईल असे पोस्टरवर दिलेल्या तारेखेवरून समजते. त्याच्या या पोस्टला काही तासातच हजारो लाईक मिळाले आहेत. मात्र चित्रपटाच्या ट्रेलरसाठी रसिकांना 13 आॅगस्ट पर्यंत वाट पहावी लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)