“सुई धागा’च्या प्रमोशनमध्ये कोहलीच्या नावाच्या घोषणा

अनुष्का शर्मा आणि वरुण धवन सध्या “सुई धागा; मेड इन इंडिया’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी दोघेही अलिकडेच जयपूरमधील एका कॉलेजमध्ये गेले होते. तिथे सगळ्या सिनेफॅन्सनी या दोघांना गराडा घातला. पण अनुष्काला बघितल्यावर या सिनेफॅन्समधील क्रिकेट फिव्हर जागा झाला आणि विराट कोहलीच्या नावानेच त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली.

गर्दीचा उत्साह अमाप होता. “सुई धागा…’च्या प्रमोशनमध्ये विराट कोहलीचा उल्लेख अनपेक्षित होता. अशावेळी अनुष्कालाच पुढाकार घ्यावा लागला. फॅन्सला शांत करण्याच्या उद्देशाने ती म्हणाली, की “तुम्हा सगळ्यांना त्यांची (विराट) आठवण येते आहे. मलाही त्यांची खूप आठवण येते आहे. तुमच्याप्रमाणे माझेही त्यांच्यावर खूप प्रेम आहे. पण आम्ही प्रमोशनसाठी आलो आहोत. त्यामुळे आता जरा “सुई धागा..’ बद्दल बोलूयात.’ असे म्हटल्यावर मग कुठे फॅन्सनी विराटच्या घोषणा देणे थांबवले.

“सुई धागा’ ही एका मध्यमवर्गीय दाम्पत्याची गोष्ट आहे. दारिद्रयातून बाहेर पडण्यासाठी आणि आपले स्वप्न साकार करण्यासाठी त्या पती पत्नीने घेतलेले कष्ट या सिनेमात बघायला मिळणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)