सुंदर दिसण्यासाठी तब्बल 154 शस्त्रक्रिया

बॉलीवूडची ख्यातनाम अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर कॉस्मेटिक सर्जरींची बरीच चर्चा झाली. अर्थात श्रीदेवी एकटी नाही तर जगात अशा अनेक सेलिब्रिटिज आहेत की, त्यांनी आपल्या परफेक्‍ट लूकसाठी आपला चेहरा अथवा अन्य अवयवांवर अनेक शस्त्रक्रिया करवून घेतल्या आहेत. मात्र, आश्‍चर्य वाटेल की एका सामान्य तरुणाने केवळ बाहुल्यासारखा दिसण्याच्या वेडापायी 51 प्लास्टिक व 103 कॉस्मेटिक अशा एकूण 154 सर्जरी करवून घेतल्या आहेत.

यामुळे तो सध्या सेलिब्रिटिपेक्षा कमी नाही. आता जर तुम्ही त्याचा चेहरा पाहिला की तो किशोरवयीनसारखा दिसून येतो. रॉड्रिगो ऍल्वेस असे त्याचे नाव असून त्याला सध्या “ह्यूमन केन डॉल’ या नावानेच ओळखले जाते.
उल्लेखनीय म्हणजे 34 वर्षीय ऍल्वेस याचा चेहरा इतका बदलला आहे की त्यामुळे गेल्या 21 सप्टेंबर रोजी दुबई विमानतळावर कर्मचाऱ्यांनी रोखले. याचे कारण की पासपोर्टवरील फोटो आणि सध्याच्या अल्वेस याचा चेहरा, यांचा ताळमेळ बसत नव्हता. रॉड्रिगो ऍल्वेसने बाहुल्यासारखा दिसण्यासाठी तब्बल 3.45 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

19 वर्षाचा असताना त्याने पहिली शस्त्रक्रिया करवून घेतली होती. आपला चेहरा अधिक सुंदर दिसण्यासाठी त्याने आपल्या चेहऱ्यावर व खांदे रूंद करण्यासाठी खांद्यावर अनेक शस्त्रक्रिया करवून घेतल्या.
ऍल्वेसच्या मते, त्याने हेअर इम्पलांट, ब्रो लिफ्ट, आई लिफ्टस्‌, चिक रिडिझाईन, जॉलाईन शेपिंग केले आहे. याशिवाय त्याने दोनवेळा गालांचे रोपण केले आहे. तसेच त्याचे सिक्‍स पॅक ऍब्स हे पूर्णपणे प्लास्टिक सर्जरीचे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)