सुंदर गणेश स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सातारा ः सुंदर गणेश स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कारप्रसंगी पोलीस निरीक्षक धुमाळ, क्‍लबचे अध्यक्ष रो. प्रद्मुम्न आगटे, डॉ. रोहन पाटील, डॉ. धनंजय देवी आदी.

सातारा, दि. 9 (प्रतिनिधी) – दरवर्षी रोटरी क्‍लब ऑफ सातारातर्फे सुंदर गणेश स्पर्धा घेतली जाते. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील गणेशोत्सवामध्ये सदर स्पर्धेसाठी सातारा शहर आणि उपनगरातील गणेशोत्सव मंडळामध्ये जाऊन रोटरी क्‍लब ऑफ सातारातर्फे केलेल्या परीक्षणानुसार निवड केलेल्या एकूण 12 गणेशोत्सव मंडळांना ढाली पुरस्कार म्हणून देण्यात आल्या.
या पुरस्कारामध्ये सुंदर गणेश (5), सुंदर देखावा (3), कायमस्वरूपी मूर्ती (2), सामाजिक कार्य करणारे नवरात्र उत्सव मंडळ (2) यांना पुरस्कार देवून गौरवण्यात आले. शुक्रवार, दि. 02 रोजी कन्याशाळा, राजपथ, सातारा येथे संपन्न झालेल्या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धुमाळसाहेब उपस्थित होते. क्‍लबचे अध्यक्ष रो प्रद्युम्न आगटे यांनी प्रस्तावना तसेच सदर उपक्रमाची, होणाऱ्या परिक्षणाची आणि रोटरीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे धुमाळसाहेब यांनी गणेशोत्सवाच्या दृष्टीने सामाजिक जबाबदारी आणि त्यासाठी सर्व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांन्च्या आदर्श वर्तनाचे महत्व विशद केले. तसे करताना सर्व गणेश मंडळांच्या उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. क्‍लबचे सचिव रो डॉ. रोहन पाटील यांनी आभार मानले आणि पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन रो डॉ धनंजय देवी यांनी केले. या कार्यक्रमास रोटरी क्‍लब ऑफ साताराचे पदाधिकारी व सदस्य, साताऱ्यातील विविध नागरिक व मान्यवर, विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)