सी. पी. जोशी यांना निवडणूक आयोगाची नोटीस 

जयपुर  – जातीयवादी विधाने केल्याबद्दल राजस्थानातील कॉंग्रेस नेते सी.पी. जोशी यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक आचार संहितेचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्यावतीने त्यांच्या विरोधात तक्रार देण्यात आल्यानंतर ही नोटीस जारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उमा भारती यांना हिंदुत्वाची काहीच माहिती नाही. केवळ ब्राम्हण असलेल्यांनाच हिंदुत्वाविषयी माहिती असते त्यांना याची माहिती नाही असे विधान त्यांनी केले होते. गुरूवारी एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे विधान केले होते.

जोशी स्वत: नाथद्वार मतदार संघातून ही निवडणूक लढवत आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना ही नोटीस जारी केल्यानंतर त्यांना रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत खुलासा करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर त्यांच्यावरील कारवाईच्या संबंधात निर्णय घेतला जाईल असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. दरम्यान आपल्या वक्तव्याविषयी सी.पी. जोशी यांनी या आधीच खुलासा केला असून त्यांनी दिलगीरीही व्यक्त केली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)