सीसीटीव्ही कॅमेरावर काळा स्प्रे मारून एटीएम लुटले

पिंपरी- एटीएम चोरीसाठी विविध प्रकारे शक्कल लावील जात आहे. यासाठी गॅस कटरचा वापर करणे, गाडीने थेट एटीएम मशीन ओढून नेणे किंवा डमी कार्ड वापरून एमटीएम मशीन “हॅंग’ करणे असे अनेक प्रकार आत्तापर्यंत पोलिसांनीही पाहिले. मात्र, यात आता भर म्हणून एटीएम मशीन परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरावर काळा स्प्रे मारून मशीनमधील साडेसहा लाख रुपये चोरले आहेत.

हा प्रकार 18 ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान पिंपळे गुरव येथे घडला आहे. याप्रकरणी जगदीश सुरेश गणेशकर (वय-33, रा. पिंपळे निलख) यांनी तक्रार दिली आहे. यावरून अज्ञात चोरट्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील नावेच्या रोड येथील बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये चोरट्याने सीसीव्ही कॅमेरावर काळा स्प्रे मारला. तसेच, एटीएम मशीन गॅस कटरने तोडून त्यातील 6 लाख 75 हजार 700 रुपये चोरले आहेत. हा प्रकार गुरुवारी (दि.21) उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असून, सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)