पिंपरी – बंद फ्लॅटमधील सीसीटीव्ही तोडून चोरट्यांनी घरातील दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना सोमवारी (दि. 21) कस्पटेवस्ती येथे उघडकीस आली.

प्रमोदकुमार गोरखप्रसाद श्रीवास्तव (वय 61, रा. निसर्ग सीटी, कस्पटेवस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीवास्तव घरच्या कामानिमित्त रविवारी (दि. 20) सायंकाळी सहा वाजता बाहेर गावी गेले. त्यांनी घराच्या सुरक्षेसाठी फ्लॅटच्या पॅसेजमध्ये सीसीटीव्ही लावले आहेत. चोरट्यांनी पॅसेजमधील सीसीटीव्ही तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले 1 लाख 80 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. श्रीवास्तव सोमवारी सकाळी अकरा वाजता घरी परत आले. त्यावेळी फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला. आतमध्ये बघितले असता, चोरी झाल्याचे उघडकीस आले. त्यांनी तात्काळ वाकड पोलिसात धाव घेतली. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)