सीरियात शाळेवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात 15 विद्यार्थी व 2 महिला ठार

सीरिया – सीरियात होत असलेल्या हवाई हल्ल्यांमुळे संपूर्ण देश हादरला आहे. लोक भीतिग्रस्त जीवन जगत आहेत. पूर्व घौटा येथील एका शाळेवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 15 विद्यार्थी आणि 2 महिलांचा मृत्यू झाला आहे. बॉंबहल्ल्यापासून जीव वाचवण्यासाठी हे सर्वजण तळघरात लपून बसले होते.

बंडखोर आणि सरकारी सैन्य यांच्यात गेले बरेच दिवस घनघोर युद्ध चालू आहे. बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या घौटातील अरवीन भागात गेला महिनाभर सरकारी फौजा हवाई हल्ले करत आहे. एका हवाई हल्ल्यात तीन क्षेपणास्त्रे शाळेवर पडली. आणि त्यात 15 विद्यार्थी आणि 2 महिला मरण पावल्याचे एसओएचआर (सीरियन ऑब्झरवेटरी फॉर ह्यूमन राईट्‌स) प्रमुख रमी अब्दुल रहमान यांनी सांगितले आहे. या हल्ल्यातून वाचलेल्यांचा शोध चालू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)