सीरियात लष्कर आणि इस्लामिक स्टेट मध्ये धुमश्‍चक्री ; 64 ठार

बैरूत – सीरियात गेल्या 24 तासांपासून इस्लामिक स्टेटचे गनिम आणि तेथील सरकारशी एकनिष्ठ असलेल्या लष्करामध्ये तूफान धुमश्‍चक्री सुरू असल्याचे वृत्त असून यात आत्ता पर्यंत दोन्ही बाजूंचे किमान 64 जण ठार झाले आहेत.

रक्का भागात घुसण्यासाठी लष्कराने जोर लावल्यानंतर या धुमश्‍चक्रीला प्रारंभ झाला. रक्कावरील आपला ताबा कायम ठेवण्यासाठी इस्लामिक स्टेटचे गनिम जोरदार झुंज देत आहेत. इस्लामिक स्टेटच्या जिहादींच्या ताब्यात राहिलेला सीरियातील हा शेवटचा भाग आहे. त्या भागातून इस्लामिक स्टेटला हुसकाऊन लावण्यात सीरियाचे लष्कर यशस्वी झाले तर इस्लामिक स्टेटचा कायमचा नायनाट होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)