सीरियात तुर्कस्तानची मोठी सैन्य मोहीम

अंकारा: मागील 8 दिवसांमध्ये सीरियाच्या आफरिन भागात 550 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा तुर्कस्तानच्या सैन्याने केला आहे. परंतु तुर्कस्तानच्या सैन्याने आफरिन प्रांतातील कुर्दिश जवानांच्या विरोधात मोहीम राबविल्याचा आरोप होत आहे.
सैन्याने एकूण 557 कुर्दिश तसेच इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना ठार केल्याचे तुर्कस्तानकडून सांगण्यात आले. 20 जानेवारीपासून ऑलिव्ह ब्रॅच मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. या मोहिमेत 13 लढाऊ विमाने तैनात करण्यात आली होती. या विमानांनी 20 दहशतवादी तळांना नष्ट केले आहे. ऑलिव्ह ब्रॅच मोहीम अत्यंत यशस्वी ठरल्याचा दावा तुर्कस्तानने केला. तुर्कस्तान सीमेवर सुरक्षा आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. याचबरोबर सीमेवर दहशतवाद्यांपासून सीरियन नागरिकांच्या सुरक्षेकरता देखील मोहीम राबविण्यात आली. आफरिन भाग जुलै 2012 पासूनच कुर्देश जवानांचे मुख्य आश्रयस्थान होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)