सीरियात अजूनही रासायनिक अस्त्रांचा धोका

पेंटॅगॉनच्या अहवालातील इशारा
वॉशिंग्टन – सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांच्याकडे अजूनही रासायनिक हल्ला करण्याची क्षमता आहे. त्यांची सध्याची ही क्षमता अत्यंत मर्यादित असली तरी या हल्ल्याचा तेथील धोका कायम आहे असे अमेरिकन संरक्षण विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेच्या लष्कराचे संयुक्त प्रमुख जनरल केनेथ मॅकनेझी यांनी हा अहवाल सादर केला आहे.

अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी सीरियात क्षेपणास्त्र हल्ले करून तेथील काही क्षेपणास्त्र निर्मीती प्रकल्प उद्‌धवस्त केले असले तरी अजून अध्यक्ष असद यांच्याकडी रासायनिक क्षेपणास्त्रांचा साठा पुर्ण संपलेला नाही. अर्थात तो अत्यंत मर्यादित पातळीवरील असला तरी त्याचा वापर होण्याचा धोका पुर्ण संपलेला नाही. स्वताचे वर्चस्व दाखवण्यासाठी ते या अस्त्रांचा पुन्हा वापर करण्याची शक्‍यता असल्याने आपल्याला त्यांच्यावर पुन्हा हल्ला करण्याची क्षमता बाळगूनच राहिले पाहिजे असेही या अहवालात सूचवण्यात आले आहे.

तथापी असद हे इतक्‍यात पुन्हा असा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पेंटॅगॉनच्या प्रवक्‍त्या डॅना व्हाईट यांनी सांगितले की, रासायनिक अस्त्रांचा वापर जग कदापिही सहन करणार नाही याची जाणिव अध्यक्ष असद यांना असलीच पाहिजे. अमेरिकेने अलिकडेच सीरियावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सीरियातील किमान तीन रासायनिक क्षेपणास्त्रांचे प्रकल्प नष्ट झाले असल्याची माहिती उप्रगह छायाचित्रांद्वारे अमेरिकेने दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)