सीरियातील रशियाच्या हवाई हल्ल्यात 37 जण ठार 

बैरूत : दमास्कसनजीकच्या पूर्व घोउटामध्ये रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात 37 नागरिक मारले गेल्याची माहिती सीरियाच्या मानवाधिकार संघटनेने दिली. हे हवाई हल्ले बंडखोरांच्या अरबीन भागांमध्ये करण्यात आले. रशियन हवाई हल्ल्यात तळघरात अडकलेल्या 37 नागरिकांचा होरपळून किंवा श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याची माहिती संघटनेचे प्रमुख रामी अब्देल रहमान यांनी दिली.

पूर्व घोउटामध्ये झालेल्या या हवाई हल्ल्यात थेटपणे सहभागाचा आरोप रशियाने फेटाळला आहे. परंतु हवाई हल्ल्याचे स्वरुप, हल्ल्यात वापरण्यात आलेला दारूगोळा पाहता हे रशियाचे काम असल्याचा दावा ब्रिटनस्थित संघटनेने केला. पूर्व घोउटाच्या बहुतेक भागांमधून बंडखोरांना हुसकावून लावण्यात आले आहे.

केवळ काही हिस्स्यातच बंडखोरांचे अस्तित्व राहिले आहे. लवकरच उर्वरित बंडखोरांचा देखील खात्मा होईल अशी अपेक्षा व्यक्त होतेय. 65 टक्के पूर्व घोउटा बंडखोरांच्या ताब्यातून मुक्त झाल्याचे रशियाचे म्हणणे आहे. मानवतावादी मोहिमेच्या प्रारंभानंतर घोउटातून बाहेर पडलेलया नागरिकांची एकूण संख्या 79702 इतकी झाल्याचे रशियन विदेश मंत्रालयाने सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)