सीरियातील क्षेपणास्त्र हल्ल्यात 26 जवान ठार

बैरूत – मध्य सीरियात काल रात्री करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सरकारच्या बाजूने लढणारेच 26 योद्धे मरण पावल्याचे वृत्त आहे. काल रात्री उशिरा हमा प्रांतात लष्कराच्या छावणीवरच हा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. ठार झालेल्यांमध्ये सीरियातील बशर अल असद सरकारच्या मदतीसाठी पाठवण्यात आलेल्या बहुतांशी इराणी सैनिकांचा समावेश आहे. चार सीरियन जवानांचाही यात समावेश असल्याची माहिती एका मानवधिकार कार्यकर्त्याने दिली.

अलेप्पो प्रांतातही एका क्षेपणास्त्र डेपोवर हल्ला करण्यात आला. त्यात तेथे ठेवण्यात आलेली बरीच क्षेपणास्त्रे नष्ट झाली. हा हल्ला इस्त्रायलच्या सैनिकांकडून करण्यात आल्याचे सांगण्यात येते पण त्याला अजून दुजोरा मिळालेला नाही. तथापी इस्त्रायलच्या गुप्तचर विभागाचे मंत्री यीस्त्राएल काट्‌झ यांनी सांगितले की तेथे असा कोणता हल्ला झाला असावा याची आपल्याला कल्पना नाही.पण ते म्हणाले की इराणच्या लष्कराचे सीरियात असलेले वास्तव्य आम्हाला मान्य नाही. त्यांना तेथे आणखी एक आघाडी उघडण्यास आमचा विरोध आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

-Ads-

इस्त्रायलने गेल्या 9 एप्रिलला तेथे असाच क्षेपणास्त्र हल्ला केला होता त्यात एकूण 14 सैनिक ठार झाले त्यातील सात सैनिक इराणचे होते असे सांगितले जात आहे. दरम्यान इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की या हल्ल्यांचे कारण देऊन त्यांनी जर तेलअव्हीवर हल्ले केले तर आम्ही थेट इराणची राजधानी तेहरानवरच हल्ले करू.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)