‘सीरिअल किसर’ इम्रान हाश्‍मीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्‍मीचा आज 39वा वाढदिवस आहे. इम्रानचा जन्म 24 मार्चला उत्तर प्रदेशमधील कन्नौजमध्ये झाला. मात्र त्याने आपले शिक्षण मुंबईतल्या सिडनहम कॉलेजमधून पूर्ण केले. 2003 मध्ये आलेल्या विक्रम भट्ट यांच्या फुटपाथ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याचा 2008 मध्ये आलेला जन्नत चित्रपट सुपरहिट ठरला.

इम्रानने फिल्म इंडस्ट्रीत ‘सीरिअल किसर’ म्हणून आपली ओळख निर्माण केली. ‘मर्डर’ चित्रपटातील त्याची भूमिका आजही प्रेक्षक विसरले नाहीत. 2006 मध्ये त्याने परवीन शहानीशी विवाह केला. इमरानच्या स्ट्रगलच्या काळात तिने त्याला नेहमीच साथ दिली आहे. त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव अयान आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)