सीमेवर भिंत बांधण्याबाबत धमकी नको – मेक्‍सिकोचे राष्ट्रपती

मेक्‍सिको (मेक्‍सिको) – सीमेवर भिंत बांधून सीमा सील करण्याची धमकी कोणी आम्हाला देऊ शकत नाही, असे उद्गार मेक्‍सिकोचे नवनिर्वाचित राष्ट्रपती अँडेस मॅन्युअल लोपेझ ओब्रॅडॉर यांनी काढले आहेत. मेक्‍सिको एक शक्ती बनत असून तो सत्तासंतुलन बदलून टाकील असे त्यांनी पुढे सांगितले. अँडेस मॅन्युअल लोपेझ ओब्रॅडॉर 1 डिसेंबरपासून राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेत आहेत.

मेक्‍सिकोची सीमा भिंत बांधून सील करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी अनेक कारणे दिली आहेत. गेल्या वर्षी मेक्‍सिकोत झालेल्या प्रचंड प्रमाणातील हत्या हे एक कारण होते.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉंपियो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने 14 मे रोजी अँडेस मॅन्युअल लोपेझ ओब्रॅडॉर यांची मेक्‍सिको शहरात भेट घेतली होती. मात्र त्या भेटीत मेक्‍सिको सीमेवर भिंत बांधण्याचा विषय चर्चिला गेला नाही. आणि ओब्रॅडॉर आणि डोनॉल्ड ट्रम्प यांच्यातील पत्रव्यवहारातही मेक्‍सिको सीमा भिंतीचा विषय आला नाही.

मात्र डोनॉल्ड ट्रम्प मेक्‍सिको सीमेवर भिंत बांधण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. संसदेने मेक्‍सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी मंजुरी दिली नाही, तर सरकार “ठप्प” करण्याची धमकी त्यांनी दिली आहे. व्हिसा लॉटरी आणि साख़ळी आधारित इमिग्रेशन समाप्त करण्याचाही त्यांचा आग्रह आहे. योग्यतेनुसार इमिग्रेशन द्यावे असे त्यांचे म्हणणे आहे.साऱ्या जगात आपली इमिग्रेशन पद्धत खराब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण एकाला देशात येण्याची परवानगी देतो आणि तो आणखी 32 जणांना घेऊन येतो याने साऱ्या जगात अमेरिकेचे हंसे होत असल्याचे त्यांनी संसदेत सांगितले आणि कायदा बदलण्याची मागणी नोंदवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)