सीमेवरेल फोटो पाकिस्तानी हेरास देणाऱ्या जवानास अटक 

फिरोझपूर, (पंजाब): सीमेवरील कुंपण आणि रस्त्यांच्या महत्वाच्या ठिकाणांचे फोटो पाकिस्तानी हेराला पुरवल्याबद्दल सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला अटक करण्यात आली आहे. शेख रियाझुद्दीन असे या जवानाचे नाव असून त्याच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने “बॉर्डर सिक्‍युरिटी फोर्स’च्या गुप्तचर विभागाने गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यावर लक्ष ठेवले होते. शेख मूळचा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रेणपूरा गावचा रहिवासी आहे. “बीएसएफ’च्या 29 व्या बटालियनमध्ये पंजाबच्या फिरोझपूर विभागात त्याची नियुक्‍ती करण्यात आली होती.

शेख रियाझुद्दीनकडून दोन मोबाईल फोन आणि 7 सीम कार्ड असल्याचे आढळून आले आहे. सीमा भागातील कुंपण, रस्ते आणि बीएसएफच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन नंबरची माहिती त्याने पाकची गुप्तहेर संस्था “आयएसआय’चा हेर
मिर्झा फैजल याला आपल्या मोबाईलवरून दिले असल्याचे निष्पन्न झाले आहेत. या प्रकरणी शेखविरोधात गोपनीय कायद्याचा भंग आणि राष्ट्रीय सुरक्षिततेला बाधा पोहोचवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)