सीबीएससीच्या दहावीतील विद्यार्थ्यांना दिलासा

दिल्ली, हरियाणातच होणार परिक्षा? : बारावी अर्थशास्त्राची फेरपरिक्षा 25 एप्रिलला
नवी दिल्ली – सीबीएसई पेपर फुटी प्रकरणी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दहावीच्या पेपर लीकची पुन्हा चौकशी होणार आहे. तसेच गरज पडल्यास केवळ दिल्ली, हरियाणा विभागांमध्येच पुन्हा परीक्षा घेण्यात येणार असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान सीबीएसई बोर्डाचा बारावी अर्थशास्त्राचा पेपर 25 एप्रिलला होणार आहे.

अनिल स्वरूप म्हणाले, दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी तपास सुरू असून 15 दिवसांत फेरपरीक्षा घ्यायची अथवा नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. फेरपरीक्षा झाल्यास ती फक्त दिल्ली आणि हरयाणामध्येच होईल आणि ती जुलैमध्ये घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीच्या बाहेर पेपर लीक झाला नाही. त्यामुळे दिल्लीबाहेरील विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दहावीचा गणिताचा पेपर 28 मार्च, तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर 27 मार्चला घेण्यात आला होता. हे दोन्ही पेपर लीक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फेरपरिक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमधून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या. या निर्णयाच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी जंतरमंतर येथे शेकडो विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली होती. तर शुक्रवारीही देशाच्या विविध भागात हिच परिस्थिती दिसून आली होती. तसेच विरोधी पक्षांनही याप्रश्नी सरकारला घेरले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)