सीबीएसई 10वी, 12वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

संग्रहित छायाचित्र

परीक्षांचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात

पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा दि.21 फेब्रुवारी ते 29 मार्च या दरम्यान होणार आहे. बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 3 एप्रिल या दरम्यान होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सीबीएसई दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक रविवारी जाहीर झाले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर हे वेळापत्रक उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना ते डाऊनलोड करता येणार आहे. या परीक्षांचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याचे सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांना परीक्षेआधी अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी सीबीएसई बोर्डाने सात आठवडे आधीच वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षा सकाळी 10 ते दुपारी दीड वाजेपर्यंत असणार आहे. उत्तरपत्रिका सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. तर, प्रश्नपत्रिका सव्वादहा वाजता देण्यात येतील. साडेदहा वाजता विद्यार्थी पेपर लिहायला सुरूवात करतील, असेही बोर्डाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)