सीबीएसई बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची फेरपरीक्षा २५ एप्रिलला…  

दहावीच्या गणित विषयाची परीक्षा घायची कि नाही याचा निर्णय १५ दिवसात 

नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने पेपरफुटीमुळे दहावी आणि बारावीचे फुटलेले पेपर पुन्हा घेण्यात येणार हा मोठा निर्णय घेतला होता. याबाबत आज नवी दिल्ली येथे केंद्रीय शालेय शिक्षण सचिव अनिल स्वरूप यांनी आज माहिती दिली. त्यामध्ये अनिल स्वरूप यांनी स्पष्ट केलं कि सीबीएसई बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची फेरपरीक्षा २५ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. भारताबाहेर पेपरफुटी झालेली नसल्यामुळे एनआरआय म्हणजेच अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा द्यावी लागणार नाहीये, असंही त्यांनी सांगितलं.

दहावीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा घ्यायची की नाही, याचा निर्णय येत्या १५ दिवसांत घेतला जाईल, असे केंद्रीय शालेय शिक्षण सचिव अनिल स्वरूप यांनी सांगितले. दहावीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा घ्यायची झाल्यास फक्त दिल्ली आणि हरयाणा या दोनच राज्यांत जुलै महिन्यात घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील सीबीएसई मधून दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)