सीबीएसई पेपर लीक प्रकरण अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली – सीबीएसईचं  पेपर लीक प्रकरण अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. अशा शब्दात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  जावडेकर  पुढे बोलताना म्हणाले की, या प्रकरणामुळे माझीही झोप उडालीआहे.   मीदेखील एक पालक आहे.  मी या परीक्षेला बसलेल्या मुलांच्या पालकांचे दुःख समजू  शकतो. सीबीएसईचा पेपर लीक झाल्याने १० वीचा गणिताचा पेपर आणि १२ वीचा अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा एकदा घेतला जाणार आहे. पेपर लीक प्रकरणाबाबत प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांना शिक्षा करण्यात येईल. दोषींना लवकरात लवकर शोधण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. एसएससी पेपर लीक प्रकरणात ज्याप्रमाणे पोलिसांनी आरोपींना पकडले आहे, तसेच याही प्रकरणातले दोषी पकडले जातील असेही जावडेकर यांनी यावेळी म्हटले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)