सीबीएसई पेपर फुटीप्रकरणी कोचिंग क्‍लासची चौकशी सुरू

नवी दिल्ली – सीबीएसई पेपरफुटी प्रकरणी राजेंद्र नगर भागातील एका कोचिंग सेंटर मालकाची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. पेपरफुटीप्रकरणाच्या तक्रारीमध्ये सीबीएसईने या कोचिंग सेंटरवर संशय व्यक्‍त केला आहे. इयत्ता 12 वीच्या अर्थकारणाचा पेपर फुटण्यामागे या कोचिंग सेंटरचा हात असल्याचा संशय आहे.

“सीबीएसई’च्या इयत्ता 10 वीचा गणित आणि इयत्ता 12 वीच्या अर्थशास्त्राचा पेपर फुटण्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून दोन स्वतंत्र प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.
या संशयित कोचिंग सेंटरचा मालक दिल्ली विद्यापिठातून उत्तीर्ण झाला असून गणित आणि अर्थशास्त्राचे क्‍लास घेतो, असे तपासाशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. मात्र या प्रकरणात सीबीएसईमधील कोणा अधिकाऱ्याचा हात असल्याबाबत कोणतेही धागेदोरे अद्याप मिळालेले नाहीत.

“सीबीएसई’च्या अधिकाऱ्याच्या सहभागाबाबत आताच काहीही सांगता येऊ शकणार नाही. मात्र आतापर्यंतच्या तपासामध्ये तरी तसे काहीही आढळलेले नाही. या संदर्भात फुटलेल्या पेपरच्या प्रती ज्यांच्याकडे आढळल्या आहेत, अशा काही विद्यार्थी आणि कोचिंग सेंटरमधील शिक्षकांशी आम्ही बोललो आहोत. फुटलेला पेपर कोणाच्या माध्यमातून मिळाला हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

व्हॉट्‌स ऍपवरून फुटलेले पेपर मिळाले, ते मोबाईल क्रमांक पोलिसांना मिळाले आहेत. त्या क्रमांकांच्या मालकांचाही शोध घेतला जात आहे.

पेपरफुटीमुळे दोन विषयांच्या परीक्षा नव्याने घेण्याचा निर्णय जाहीर झाल्यावर अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्‍त केली आणि मंडळाच्या कारभारावर टीका केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)