सीबीएसई परिक्षेत पहिल्या आलेल्या मुलीवर सामुहिक बलात्कार

हरियानातील प्रकार; मुलगी बेशुद्धावस्थेत आढळली
चंदीगड – सीबीएसई परिक्षेत देशात पहिली आलेल्या व त्याबद्दल राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या एका एकोणिसवर्षीय मुलीवर हरियानात सामुहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. ही मुलगी हरियानातील एका खेड्यात राहते. ती सध्या कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकत असून ती आपल्या शिकवणुकीसाठी जात असताना तीन अज्ञात व्यक्तींनी तिला पळवून नेले आणि त्याच्यावर सामुहिक बलात्कार केला. या प्रकरात ती बेशुद्ध पडली असून ती बेशुद्ध पडेपर्यंत आरोपींकडून तिच्यावर अत्याचार सुरू होते. नंतर या आरोपींनी सदर मुलीला एका बसस्टॅन्डवर सोडून देऊन तेथून पळ काढला. बुधवारी हा प्रकार घडला आहे.

आरोपींनी या मुलीला तिच्या गावाजवळील शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तीन जणांनी हा प्रकार केल्यानंतर तेथे शेतात काम करणाऱ्या काही जणांनीही तिच्यावर अत्याचार केल्याचे उघडकीला आले आहे. हे सर्व आरोपी या मुलीच्या गावचेच आहेत. गावच्या पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यामुळे एका पोलिस ठाण्याहून दुसऱ्या पोलिस ठाण्याकडे धावपळ करण्यात मुलीच्या आईवडिलांची पळापळ झाली.

दरम्यानच्या काळात सदर आरोपींनी या आईवडिलांना पोलिसांत तक्रार दिली तर ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर पुन्हा त्यांनी पोलिस तक्रार देण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली. वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की या पालकांनी ज्या पोलिसांत ही तक्रार दिली त्या हद्दीत हा प्रकार घडला नव्हता त्यामुळे झिरो एफआयआर नोंदवण्यात आला. नंतर तो गुन्हा संबंधीत पोलिस ठाण्याकडे वर्ग करून तेथे नियमीत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)