सीबीएसई दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. देशभरातून 16.88 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

सीबीएसई दहावीचा निकाल  cbseresults.nic.in आणि cbse.nic.in या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहे. यंदाच्या वर्षी 16.88 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. सीबीएसईच्या 2018च्या (दहावी आणि बारावीच्या संयुक्त) परीक्षेला जगभरातून 28 लाख विद्यार्थी बसले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )चे दहावी आणि बारावीचे पेपर फुटले होते. त्यामुळे त्या पेपर फुटलेल्या विषयांच्या फेरपरीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्याच वेळी दिल्ली व हरियाणा वगळता इतर राज्यातील दहावीच्या मुलांना दिलासा देण्यात आला होता. बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची 25 एप्रिलला पुनर्परीक्षा घेण्यात आली होती. परंतु दहावीच्या गणिताच्या पेपरची फक्त हरियाणा आणि दिल्लीतच फेरपरीक्षा झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)