सीबीएसई : दहावीचा ऑनलाईन निकाल आज होणार जाहीर

पुणे : केंद्रीय शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (मंगळवारी) ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. दुपारी चार वाजता हा निकाल जाहीर होईल, अशी घोषणा ‘सीबीएसई’ने केली आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही घोषणा केली. ‘सीबीएसई’च्या बारावीच्या परीक्षेचा निकाल २६ मे रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला होता. यंदाची दहावीची परीक्षा काहीशा गोंधळातच पार पडली. दिल्ली-एनसीआर, हरियाणा व झारखंड येथे गणिताचा पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या विषयाची परीक्षा पुन्हा घ्यावी की नाही, यावर वादंग झाल्यानंतर अखेर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ही परीक्षा पुन्हा न घेण्याचाच निर्णय घेतला होता. दहावीच्या परीक्षेचा निकाल cbse.nic.in या वेबसाइटवर दुपारी चारनंतर पाहता येईल असे ‘सीबीएसई’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)