राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली –  हरियाणामध्ये राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित विद्यार्थिनीवर पाच जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. महिंद्रगड जिल्ह्यातील कनिना गावात बुधवारी ही घटना घडली. वृत्तानुसार, पाच कथित आरोपींनी पीडितेला अंमली पदार्थ खाण्यास देऊन तिचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार करून तिला बस स्टॅण्डवर सोडून फरार झाले.

पीडित मुलगी ही १९ वर्षीय असून सध्या ती द्वितीय वर्षास आहे. पीडित मुलगी कोचिंग क्लासला जात असताना पाच जणांनी लिफ्ट देण्याचा बहाण्याने तिचे अपहरण केले व पीडितेला अंमली पदार्थ खाण्यास देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर आरोपी पीडितेला एका बस स्टॅण्डवर सोडून फरार झाले. पाचही आरोपी पीडितेच्या गावातील असल्यामुळे पीडित मुलगी त्यांना ओळखत होती.

दरम्यान, गुन्ह्याची नोंद करून घेण्यास पोलिसांनी अत्यंत विलंब केला. यामुळे वारंवार पोलीस स्थानकाच्या चक्करा माराव्या लागल्याचा आरोप पीडितेने केला आहे. शिवाय १६ तास उलटूनही अद्याप एकही आरोपीला पकडण्यात आलेले नसळायचेही तिने सांगितले.

राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार 

पीडित मुलीने २०१५ मध्ये सीबीएसई बोर्डात हरियाणा राज्यातून टॉप केले होते. शिवाय २६ जानेवारी २०१६ रोजी तिला राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानितही करण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)