सीबीएसईच्या फेरपरीक्षेला मुलांना बसवू नका – राज ठाकरे

माझे देशभरातील पालकांना आवाहन आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना फेरपरीक्षेला बसवू नका. कारण तुम्ही झुकताय हे सरकारच्या लक्षात आले, तर ते तुम्हाला अजून वाकविण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही निर्णयावर ठाम रहा. सरकारला काय निर्णय घ्यायचा तो घेऊ दे. मनसे देशभरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या पाठिशी ठामपणे उभी आहे आणि राहील.
– राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

मुंबई – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) पेपरफुटीनंतर होणाऱ्या फेरपरीक्षेला तुमच्या मुलांना बसवू नका, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालकांना केले आहे. तुम्ही झुकताय हे जर सरकारच्या लक्षात आले, तर ते तुम्हाला आणखीन वाकवायचा प्रयत्न करतील. तुमच्या निर्णयावर तुम्ही ठाम रहा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देशभरातील विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठिशी ठामपणे उभी राहील, असे आश्वासनही राज ठाकरे यांनी दिले आहे.

सीबीएसईचा दहावी इयत्तेचा गणित तसेच बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटला होता. दहावीचा पेपर 28 मार्चला तर बारावीचा पेपर 27 मार्चला झाला होता. पेपरफुटल्यानंतर तो व्हॉटस ऍप तसेच इतर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. बोर्डाच्या या निर्णयानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सीबीएसईत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी शुक्रवारी सकाळी राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी राज ठाकरे यांनी या पालकांना दिलासा देत आपल्या मुलांना फेरपरीक्षेला न बसविण्याचे आवाहन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)