सीबीएसईच्या फेरपरीक्षेला मुलांना बसवू नका – राज ठाकरे

मुंबई : सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेला बसवू नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी पालकांना केले आहे. इयत्ता दहावीचा गणित आणि इयत्ता बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्याने या विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली.

पेपर फुटीमध्ये सरकारचा अक्षम्य हलगर्जीपणा असल्याचे मनसे अध्यक्षांनी सांगितले. राज ठाकरे यांनी या मुद्द्यावर प्रसिद्धीपत्रक जारी करुन पालकांनी आपल्या मुलांना फेरपरीक्षेला बसवू नये, असे आवाहन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)