सीबीएसईच्या प्रश्नपत्रिकेबाबत आक्षेप नोंदवता येणार

पुणे- परीक्षा झाली की प्रश्न चुकीचे असल्याच्या, अभ्यासक्रमाबाहेरचे असल्याच्या चर्चा, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा संभ्रम या सगळ्यावर केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएसई) तोडगा काढला आहे. प्रश्नपत्रिकेबाबत विद्यार्थी आक्षेप नोंदवू शकणार आहेत. एखादा प्रश्न चुकीचा असेल, अभ्यासक्रमाबाहेरचा असेल, भाषांतराची चूक असेल, प्रश्न संदिग्ध असेल किंवा चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला असेल तर विद्यार्थी, शिक्षक आक्षेप नोंदवू शकतील. मात्र परीक्षा झाल्यानंतर 24 तासाच्या आत हे आक्षेप मंडळाकडे पोहोचणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे शाळांच्या माध्यमातून हे आक्षेप मंडळाकडे पोहोचणे गरजेचे आहे. आलेल्या आक्षेपांवर मंडळाचे तज्ज्ञ निर्णय घेणार आहेत. शाळांनी थेट मंडळाकडेच आक्षेप पाठवावेत, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज, अस्वस्थता पसरणार नाही याची काळजी घ्यावी, अशी सूचनाही मंडळाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)