सीबीएसईचा पेपर 35 हजारात विकत घेतल्याचा धक्‍कादायक खुलासा

नवी दिल्ली – देशभर गाजत असलेल्या सीबीएसई पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एका उमेदवाराने 35 हजार रुपये मोजून पेपर खरेदी केल्याची आणि नंतर ही डोईजड किंमत वसूल करण्यासाठी त्याचा बाजार मांडल्याचा खुलासा दिल्ली पोलीसांच्या तपासात समोर आला आहे. व्हाटसऍप द्वारे हा पेपर कोणाला 5 हजारात तर कोणाला 10 हजारात देण्यात आल्याचे दिसून आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांच्या हाती जो लिहिलेला पेपर आला आहे, त्याच्या अक्षराची तपासणी करण्यात येईल. पोलीसतपास चालू असल्यापैकी किंवा संशयाच्या जाळ्यात असल्यापैकी कोणाचे तरी हे अक्षर असू शकेल. गुरुवारी संध्याकाळी उशिरापर्यंत सुमारे 4 तास चाललेल्या तपासात पेपरसंबंधित छपाई, वाहतूक, उत्तरपत्रिकांची सुरक्षितता आदी अनेक बाजूंनी चौकशी करण्यात आली. हा फुटलेला पेपर सुमारे 1,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणी आतपर्यंत 18 विद्यार्थी आणि 5 ट्यूटरसह 25 जणांची चौकशी करण्यात आलेली आहे. मात्र दोन्ही पेपर्स फोडणाऱ्या मास्टरमाईंडपर्यत पोहचण्यात पोलीसांना यश आलेले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)